पश्चिम बंगालमध्ये गॅंगस्टरचं सरकार, ममतां विरोधात भाजपचे जंतरमंतरवर आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा: पश्चिम बंगालमध्ये गॅंगस्टरचं सरकार असून ममता बॅनर्जी यांनी लोकशाही संपवली आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांवर हल्ले तसेच कार्यकर्त्यांना मारल जात आहे, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. मंगळवारी झालेल्या हिंसाचाराविरोधात निवडणूक आयोगाची भेट घेत भाजपने तृणमूल कॉंग्रेसवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन देखील करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील मतदानाला चार दिवस उरले आहेत, मात्र राजकीय पक्षांमधील प्रचाराचा संघर्ष आता हिंसाचार बदलताना दिसत आहे, मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा. त्यामुळे पश्चिम बंगालमधील वातावरण तापले आहे.

कोलकातामध्ये अमित शहा यांची मंगळवारी सभा होणार होती, सभेआधीच बंगाल पोलिसांनी जात परवानगीचे कागदपत्र मागितले. मात्र, कागदपत्र ने देऊ शकल्याने थेट सभामंडप तोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दुसरीकडे शहा यांची रॅलीसुरु झाल्यानंतर ट्रकवर काठ्या भिरकावल्याने वातावरण तापले. यावेळी तुफान दगडफेक झाली.