fbpx

सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून पैशाचा वापर

rahul gandhi

बंगळुरू – कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने शनिवारी कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. ‘भाजपाला कायद्याने रोखले आहे. पण आता सत्तास्थापनेसाठी भाजपा पैसा व बळाचा वापर करेल ’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.