भाजप सोडणार नाही; पण मंत्रिपद नकोच – एकनाथ खडसे

मुंबई – भूखंड घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या एकनाथ खडसे यांना बराच काळ मंत्रिपदापासून दूर राहावे लागले. दरम्यान भूखंड घोटाळ्यात क्लिनचीट मिळाल्यानंतर नाथाभाऊंचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा होती मात्र, खडसे अजूनही पक्षावर नाराज असून, आपण भाजप सोडणार नाही मात्र, या मंत्रिमंडळात काम करण्याची इच्छा नसल्याचं सांगत त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.

”माझ्या अडचणीच्या काळात पक्ष माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे. भाजपचा त्याग करणे हे माझ्या स्वप्नातही येऊ शकत नाही. मी कदापि भाजप सोडणार नाही आणि मला या मंत्रिमंडळात परतण्याची इच्छा नाही,” अशी माहीती पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिली. ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलतं होते.

ते बोलताना पुढे म्हणाले की, ‘एक वर्षाने राज्यात विधानसभेची निवडणूक आहे.तसेच स्थानिक निवडणुकाही होत आहेत. त्यामुळे मला त्या दृष्टिने तयारी करायची आहे. त्यामुळे मला आता मंत्रिमंडळात परण्याची कोणतीही इच्छा नाही. खूप काम करायचे आहे.” दरम्यान खडसे यांच्या या वक्तव्याने ते अजूनही भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे.

You might also like
Comments
Loading...