भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश नाही; पण मी दुसऱ्यांदा मंत्री होणार : रामदास आठवले

ramdas-athawale

टीम महाराष्ट्र देशा : २३ मे ला लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निकालाआधीच वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळणार नाही असं भाकीत केल आहे.

Loading...

रामदास आठवले सध्या महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. लातूर येथे बोलताना त्यांनी ‘भाजप आणि एनडीएला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात फटका बसेल तसेच २३ मे च्या निकालात भाजपला २६० ते २७० जागा मिळतील तर एनडीए ला ३०० ते ३२५ जागा मिळण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. पुढे बोलताना त्यांनी ‘केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असून आपलीही आगामी मोदी मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा मंत्रीपदी वर्णी लागेल’ असा आत्मविश्वासही व्यक्त केला.

दरम्यान, पश्चिम बंगाल, ओडीसा, दक्षिण भारतात भाजपला चांगलं यश मिळेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.Loading…


Loading…

Loading...