fbpx

भाजप लिंगायत समाजाचं विभाजन होऊ देणार नाही : अमित शहा

amit-shah

टीम महाराष्ट्र देशा : ”लिंगायत समाजाचं विभाजन होऊ देऊ नका अशी लिंगायत समाजातील अनेक महंतांची मागणी आहे. हे विभाजन होणार नाही, जोपर्यंत भाजपा आहे तोपर्यंत कोणतंही विभाजन होणार नाही, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची शिफारस केंद्र सरकार मान्य करणार नाही” असं आश्वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महंतांना दिले आहे.

नेमकं काय म्हणाले अमित शहा

लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देणं म्हणजे हिंदूंचं विभाजन करण्याचं पाऊल आहे, लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून तोडण्याचा हा डाव आहे. लिंगायत समाजाचं विभाजन होऊ देऊ नका अशी लिंगायत समाजातील अनेक महंतांची मागणी आहे. हे विभाजन होणार नाही, जोपर्यंत भाजपा आहे तोपर्यंत कोणतंही विभाजन होणार नाही, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची शिफारस केंद्र सरकार मान्य करणार नाही.