यापुढे भाजपाला कधीच “अच्छे दिन” येणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झाला आहे – राष्ट्रवादी

ncp vs bjp

सांगली : सांगली -मिरज-कुपवाड महापालिकेच्या महापौरपदाचा धक्कादायक निकाल लागला असून सांगली मनपावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा लागला आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत.भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी निवडून आले.

सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेत ७८ जागा असून यामध्ये पक्षीय बलाबल भाजप – ४१, अपक्ष – २, काँग्रेस – २० राष्ट्रवादी-१५ असे होते. राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला. भाजपची सहा मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

भाजपाला पराभूत केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘यापुढे भाजपाला कधीच “अच्छे दिन” येणार नाहीत, यावर शिक्कामोर्तब झाला आहे. जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारून भाजपला बाहेरचा रस्ता दाखवलाय,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

तर, ‘भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सातत्याने जयंत पाटील यांच्यावर वेगवेगळी वक्तव्ये करताना दिसत होते परंतु पुणे पदवीधरची निवडणूक झाली आणि आजची निवडणूक होऊन भाजप पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार झाली आहे,’ असा घणाघात देखील महेश तपासे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या