fbpx

आमच्या माहितीनुसार भाजपचा पराभव होतोय : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा :देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होत आहे. त्यातील ४ टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून निकालाबाबत आतापासूनच तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचा पराभव होत आहे असं विधान केल आहे.

दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘अर्ध्यापेक्षा जास्त मतदान पार पडलंय, आमच्या अंतर्गत माहितीनुसार भाजपचा पराभव होत आहे, असा दावा काँग्रेस केला. राजधानी हा दावा केला आहे. मोदींनी देशाला सांगितलं होतं की वर्षाला २ कोटी रोजगार देऊ, मात्र आज सर्वात जास्त बेरोजगारी आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

तसेच, भाजपची खोटी आश्वासने, नरेंद्र मोदींचा भ्रष्टाचार, बेरोजगारी यामुळे भाजपचा पराभव निश्चित, आज कुठेही केवळ ‘चौकीदार’ म्हणा, आपोआप ‘चोर है’ जोडलं जाईल, असा टोमणा राहुल गांधींनी मोदींना लगावला आहे.