Share

BJP | “2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचा पराभाव होणार”, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं भाकीत

BJP | मुंबई : अलिकडेच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला अध्यक्षपदाची एकही जागा मिळाली नाहीये. तर अनेक ठिकाणी जनत भाजप पक्षावर नाराज असल्याचं देखील चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) पक्षाचे माजी राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी (Subrmnyam Swami) यांनी मोठा दावा केला असून लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

भाजपसाठी हा एक इशारा असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला हार पत्करावी लागू शकते, असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. ढासळत चाललेली अर्थव्यवस्था आणि सीमा क्षेत्रात चीनला गमावलेला भूभाग ही देखिल भाजपच्या विजयात अडसण ठरणारी कारणे असणार असल्याचं देखील ते म्हणाले.

दरम्यान, नागपूर हा भाजपचा बालेलिकल्ला मानला जातो. नितीन गडकरी, देवेंद्र गडकरी आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ज्या भागातून येतात तेथेच भाजपला शून्य जागा मिळणे ही मोठी बातमी आहे. भाजपला या पराभवाचे पोस्ट मार्टम करण्याची आणि दुरूस्ती करण्याची गरज आहे, असं सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याबाबतचं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. यावेळी भारत आणि चीन, रशिया व अमेरिका या देशांशी असलेल्या संबंधात दरी निर्माण होत चालली असून पाकिस्तानचे संबंध या देशांसोबत सुधारत आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

BJP | मुंबई : अलिकडेच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला अध्यक्षपदाची एकही जागा मिळाली नाहीये. तर अनेक …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now