राहुल गांधींनी उचलेल्या या पाऊलामुळे भाजपला गमवाव्या लागणार ३० जागा

narendra modi sad

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने किमान उत्पन्न ही गरिबांच्या हिताची योजना आणली आहे त्यामुळे आता याचा फटका भाजपला बसण्याची शकयता आहे. कारण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना वर्षाला 72 हजार रुपयांची मदत देण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलं आहे. त्यामुळे भाजपच्या खोट्या आश्वासंनाना आणि दुष्काळाला कंटाळलेले शेतकरी कॉंग्रेसच्या मृगजळाला भुलणार असा अंदाज भाजपच्याचं सर्वेक्षणाने वर्तवला आहे.

या सर्वेक्षणा नुसार भाजपला कॉंग्रेसच्या या योजनेमुळे ३० जागा गमवाव्या लागणार आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या सर्व घडामोडीमुळे यंदाच्या लोकसभेचे जनमत मोदींच्याचं बाजूने झाले होते. मात्र कॉंग्रेस ने गरिबांच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेली न्याय ही योजना भाजपचे जनमत आपल्या कडे वळवण्यात यशस्वी ठरत आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणानेचं भाजपसाठी धक्कादायक असणारी बाब समोर आणली आहे.

छत्तीसगडमध्ये न्यायचा सर्वाधिक फटका बसेल, असं भाजपाचं सर्वेक्षण सांगतं. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड आणि दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तेलंगणातही न्यायचा परिणाम जाणवेल, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली. मात्र सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशात न्यायचा परिणाम तितकासा जाणवणार नाही, असा अंदाज आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात असल्याने कॉंग्रेस पक्षाने जनते समोर चंगलीच गुगली टाकली आहे. आम्ही जर सत्तेत आलो तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना वर्षाला 72 हजार रुपयांची मदत करणार आहोत असे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. तसेच देण्यात येणारी रक्कम ही घरातल्या गृहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या या गुगलीला फायदा जनतेला जरी होणार असला तरी विकेट मात्र भाजपची जाणार आहे.