fbpx

…तर भाजपला विरोधी पक्षात बसावे लागेल- अजित पवार

Dev fadnvis and ajit pawar

मुंबई: भाजपाची धोरणे ठरवणाऱ्या नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करायला सुरूवात केली आहे. शिवसेनेची युती करावीच लागेल, असे जाहीरपणे सांगतात. यावरून एक स्पष्ट होते की, शिवसेनेची साथ सोडल्यास आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागेल. याची जाणीव त्यांना आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी आणि स्वत: पक्षाध्यक्ष अमित शहा हे जाहीरपणे शिवसेनेशी युती करावीच लागेल. असे सांगतात. त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होते. भविष्यात वेळ पडल्यास हे भाजपा नमते घेईल आणि शिवसेनेला जास्त जागा देईल, अशी शक्यताही अजित पवार यांनी वर्तविली.