भाजपमध्ये गेलेल्या जितिन प्रसाद यांना भाजप देणार ‘हे’ मोठे बक्षीस

jatin prasad

मुंबई : राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अनेक नेते त्यांच्यापासून दूर जात आहेत. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली. राजीव सातव यांचे आकस्मिक निधन तर देशाला चटका लावून गेले. तर आता उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जितिन प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

दरम्यान आता काँग्रेसला गुडबाय करत भाजपत प्रवेश केलेल्या जितिन प्रसाद यांना मोठे बक्षीस मिळू शकते. भजपकडून त्यांना विधान परिषदेवर पाठविले जाऊ शकत असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. पक्षातील उच्च पदावरील सूत्रांनी ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिली आहे. याशिवाय त्यांना, उत्तर प्रदेश भाजप अथवा राष्ट्रीय स्तरावरही संघटनेत मोठे पद मिळण्याची शक्यता आहे.

जितिन प्रसाद यांनी का सोडले काँग्रेसला? : 

राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद आहेत. उत्तर प्रदेशमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या प्रसाद हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशमध्ये पक्षासाठी ब्राह्मण समाजाच्या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मागील काही काळापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या सक्रिय झाल्या आहेत. तेव्हापासून प्रसाद यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. प्रसाद यांनी प्रियांका यांना थेट विरोध केलेला नसला तरी ते नाराज होते.

महत्वाच्या बातम्या

IMP