सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारनं केलेला कायदा फेटाळत 15 दिवसांत निवडणुका जाहीर करा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. ठाकरे सरकारनेच ओबीसीचा गळा घोटल्याचा आरोप भाजपने केला आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपने ओबीसी मोर्चाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं होतं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारनं केलेला कायदा फेटाळल्यानंतर आता महाविकास आघाडी सराकरवर सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.