fbpx

भाजप जेथून सांगेल तेथून लढणार : सुभाष देशमुख

सोलापूर –  (सूर्यकांत आसबे) भारतीय जनता पार्टी जिथे सांगेल तिथे आपण लढणार आहोत. मी मागणार नाही, नाही म्हणणार नाही,मात्र लढ म्हणतील तेथून लढणार असल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदार संघातून लढण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. मार्डी येथील हुरडा पार्टीनंतर माध्यमाच्या प्रतिनिधींशी देशमुख बोलत होते.

भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. १९९८ साली राजकारणात आलो आहे. १९९८ साली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला उभारलो. त्यावेळी मुदत संपली. त्यानंतर पुन्हा सोलापूर लोकसभेला भाजपने संधी दिली. सोलापूर लोकसभेला उभारलो. तो मतदार संघ राखीव झाला. त्यानंतर २००९ साली माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढविली आणि दणदणीत पराभव पत्करावा लागला. तेथून परत तुळजापूरला आलो तेथेही पराभव झाला. २०१४ ला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून विजयी झालो. आता उद्या भारतीय जनता पार्टी जिथे सांगेल तिथे आपण लढणार आहोत. मी मागणार नाही, नाही म्हणणार नाही,मात्र लढ म्हणतील तेथून लढणार असल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्र्याला लोकसभेचे क्लस्टर केले आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे कोल्हापूर, हातकणंगले, सांगली आणि सातारा या चार लोकसभेचे क्लस्टर करून प्रमुख केले आहे. आपणास सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघासाठी क्लस्टर केले आहे.सोलापूर लोकसभेचे प्रभारी खासदार अमर साबळे आहेत तर माढा लोकसभा मतदार संघाचे प्रभारी अविनाश कोळी आहेत. प्रत्येकाला जबाबदारी दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रवास केला आहे आणि आजही करतोय . माढा लोकसभा मतदार संघात क्लस्टर प्रमुख म्हणून माझी जबाबदारी मी पार पडत असल्याचे सांगत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघात भाजपचेच खासदार असतील असेहि नामदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.