‘बंगालमध्ये सत्तेमध्ये जरी नाही आलो तरी जनतेच्या विकासासाठी भाजपा अविरत काम करत राहील’

prerana honrao

पुणे – आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे.सोबतच काही राज्यांमधील पोट निवडणुकांचे निकाल देखील समोर येत आहेत. इतर राज्यातील निवडणुकीपेक्षा संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागले आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे.सुरुवातीच्या कलामध्ये तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने २०७ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ८१ जागांवर आघाडीवर आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या प्रेरणा होनराव यांनी या निकालांवर भाष्य केले असून या कोरोनाच्या कठीण प्रसंगांमध्ये भाजपाच्या विचारांवर व भाजपाच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दर्शविला आहे हे पाहून खरोखर समाधान वाटते असे त्यांनी म्हटले आहे.

‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या, आसाम मध्ये भाजपा पूर्ण बहुमताने पुन्हा एकदा सत्ता स्थापित करत आहे व पांडेचेरी मध्ये भाजपा पहिल्यांदाच सत्तेत सहभागी होत आहे हे चित्र खूप आनंददायी आहे. बंगालमध्ये भाजपाला विकास अपेक्षित होता आणि त्याच मुळे यावेळेस ममताजींची सत्ता पटवून,विकासासाठी सत्तेत येणे अपेक्षित होते.

त्या पुढे म्हणाल्या, भाजपाने जवळपास 40 टक्के मतदान घेऊन तीन वरून 90 च्या जवळपास जागा घेऊन राज्यावर आपली पकड घट्ट केली आहे. सत्तेमध्ये जरी नाही आलो तरी एक भक्कम विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या विकासासाठी भाजपा अविरत काम करत राहील व येणाऱ्या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये आणखीन मजबूत झालेली आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाही.केरळ आणि तामिळनाडू मध्ये भाजपाला मागच्या पेक्षा जास्त जागा मिळाल्या ही सुखद वार्ता आहे,तरी येणाऱ्या काळामध्ये जनतेसाठी या राज्यांमध्ये भाजपा मोठ्या प्रमाणावर काम करेल.

निरनिराळ्या पोटनिवडणुकांमध्ये सर्व राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे पण महाराष्ट्रातील पंढरपूर येथील पोटनिवडणुकीतील विजय हा विशेष आहे. पंढरपूर ही महाराष्ट्राची धार्मिक राजधानी आहे आणि पहिलंयांदाच भाजपाने तेथे विजय मिळविला आहे. महाविनाश आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढुनही आपला परंपरागत बालेकिल्ला वाचवु शकले नाहीत,यातुन सर्वत्र अपयशी झालेल्या या अनैसर्गीक सरकार विरूध्द जनतेचा रोष स्पष्ट झाला आहे.या निकालाने तिन पक्ष मिळुन देखील भाजपाचा विकासाचा रथ रोखु शकणारं नाहीत हे सिध्द होत आहे असे त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

IMP