Ravi Rana | अमरावती : गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निकालांमध्ये भाजपने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. भाजप 158, काँग्रेस 16, आप 5 आणि इतर 3 वर आघाडीवर आहेत. भाजपने शपथविधी सोहळ्याची तारीख देखील जाहीर केली आहे. 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता हा सोहळा होणार आहे. दरम्यान आमदार रवी राणा यांनी या निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे.
“गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे, नरेंद्र मोदींनी इतिहास घडवला, गुजरात देशाच्या विकासाचे उदाहरण आहे तर 2024 च्या लोकसभेत सुद्धा मोदी बाजी मारतील. तसेच मोदी, अमित शहा व देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुद्धा भाजपची सत्ता येईल. तर आघाडीत बिघाडी झाल्यामुळे भाजपचा झेंडा राज्यात फडकेल”, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला.
गुजरातमध्ये 182 विधानसभा जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. गुजरातमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पक्षाच्या (आप) जोरदार उपस्थितीमुळे यावेळी निवडणूक लढत तिरंगी झाली.
गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. 2002 च्या निवडणुकीत भाजपने गुजरातमध्ये 127 जागा जिंकल्या होत्या. दरम्यान हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. 2002 मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
2017 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर एकूण 182 जागांपैकी भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. गुजरातमध्ये आतापर्यंत भाजपने 2002 मध्ये सर्वाधिक 127 जागा जिंकल्या होत्या. आता भाजप 150 पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो असा दावा केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nana Patole | “गुजरातचा विजय लोकशाही पद्धतीने नाही”; नाना पटोले असं का म्हणाले?
- Skin Care Tips | ‘या’ पद्धतीने कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यास मिळू शकतात अनेक फायदे
- Gujarat Election Result | “राहुल गांधी देशाचे नेतृत्व होऊ शकत नाही” ; गुजरात निकालांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया!
- Cyclone Mandous | ‘मंदोस’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम, तर राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
- Himachal Pradesh Election Result | हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला ‘ऑपरेशन लोटस’ची भीती, घेतला ‘हा’ निर्णय