कसही लढलं तरी भाजपचं ठरणार अव्वल, कॉंग्रेस आघाडी पुन्हा सत्तेपासून वंचित

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचे आता बिगुल वाजले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. राज्यात खरी लढाई ही शिवसेना भाजप युती आणि कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी यांच्यात असणार आहे. तर वंचित आघाडी आणि एमआययांची लढत ही निर्णयक ठरणार आहे. यासर्व राजकीय पक्षांच्या गेल्या ५ वर्षातील कारभार लक्षात घेता माध्यमांनी एक सर्व्हे जाहीर केला आहे. या सर्व्हेत भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याच सांगितल जात आहे. तर शिवसेना ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला यावेळेस ही सत्तेपासून वंचित राहावे लागणार आहे.

एबीपी माझा या वृत्त वहिनीनी या संदर्भात सर्व्हे केला होता. त्यांच्या सर्व्हेनुसार सगळे पक्ष वेगळे लढल्यास भाजपला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. मात्र शिवसेनच्या जागांमध्ये २०१४च्या तुलनेत घट होणार आहे. तरीदेखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस राहणार आहे. तर हेच पक्ष युती आणि आघाडी कडून लढल्यास भाजप – सेना युतीचे सरकार अगदी सहज येणार आहे. महायुतीला तब्बल 205 जागा मिळणार आहेत. महाआघाडीला मात्र अवघ्या 55 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे युती करून किंवा स्वतंत्र लढल तरी भाजपचं पारड जड असल्याचं दिसत आहे.

दरम्यान अखेर विधानसभेचे बिगुल वाजले आहे. 21 ऑक्टोबरला राज्यात एकाच टप्यात मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच विधानसभेचे फटाके वाजणार आहेत. एकाच टप्यात निवडणुका घेऊन निवडणुक आयोगाने निवडणूक प्रक्रियेचा वेळ कमी कमी केला आहे. मात्र विरोधकांनी याचं प्रक्रियेवर शंका निर्माण केली आहे. मतदान एकाच दिवसात घेता, मात्र निकाल ३ दिवसांनी का लावता? असा सवाल विरोधकांनी उपस्थितीत केला आहे.