आता भाजप डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनाही रामभक्त म्हणेल – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या निवडणुकांआधी भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ही रामभक्त म्हणेल अशी जहरी टीका भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. तर आनंद आंबेडकर यांनी देखील भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारने एक विधेयक विधानसभेत पारित केलं असून या विधेयकानुसार आता उत्तर प्रदेशच्या शासकीय कागदपत्रांवर आणि शालेय पुस्तकांमध्ये त्यांचं नाव भीमराव रामजी आंबेडकर असं लिहिलं जाणार आहे. यावरून भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन्ही नातू प्रचंड संतापले आहेत.

बाबासाहेब आपलं पूर्ण नाव फक्त मराठीत सही करताना वापरायचे बाकी सर्वत्र ते बी.आर.आंबेडकर इतकंच लिहायचे अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. तर हे सगळं भाजप आपली विचारधारा पसरवण्यासाठी करते आहे असा आरोप कांचा इलैया यांनी केला आहे.

You might also like
Comments
Loading...