ओबीसींना आरक्षण न मिळाल्यास भाजप जबाबदार असेल- नाना पटोले

मुंबई : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली होती. मात्र, आता निवडणुका घेण्याचा संपूर्ण अधिकार आयोगाला आहे, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निवडणुकींपूर्वी ओबीसी आरक्षनाचा प्रश्न निकाली न निघाल्यास ओबीसी उमेदवारांवर अन्याय अन्याय होणार आहे. ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत आता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे.

केंद्र सरकारने लवकरात लवकर इम्पिरीकल डेटा द्यावा. ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर भाजप त्याला जबाबदार असेल, अशी जोरदार टीका नाना पटोलेंनी भाजपवर केली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्राने इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली आहे.

‘राज्य सरकारने मागास आयोग तयार करावा. त्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा तयार करावा आणि पुन्हा न्यायलयामध्ये यावे, असा सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्याकडील डेटा आम्हाला द्यावा. तो कोर्टात दिल्यास ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मागास आयोग डेटा गोळा करण्याचं काम करणार आहे. पण आयोग लोकांपर्यंत पोहचत असताना कोरोना सुद्धा आहे याचा विचार करावा लागेल. केंद्र सरकारने सांगितलं आहे. आम्ही जाती जनगणना करायची नाही. त्यामुळे आयोगाने डाटा गोळा करण्यासाठी ४५० कोटी रुपये मागितले आहेत. ओबीसींना आरक्षण न देण्याची राज्य सरकारची भूमिका नसती तर आयोग बसविला नसता, असंही नाना पटोलेंनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या