fbpx

माढ्यात भाजपकडून विजयसिंह मोहिते पाटील लढणार?

टीम महाराष्ट्र देशा – भाजपकडून आज माढा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेसाठी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विजयसिंह मोहिते यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली तर माढ्यात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय शिंदे यांचं आव्हान असेल

मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळत नसल्याचं चित्र पाहून रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती.

भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र माढा मतदारसंघासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं. त्यामुळे माढामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे आणि भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार असं म्हटलं जात होतं. आता पुन्हा एकदा विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं समोर आल्याने, उमेदवारीसाठी त्यांचीच चर्चा आहे.