Share

Arvind Kejriwal | मोरबी पूल बनवणाऱ्या कंपनीकडून भाजपला फंडिंग होत होतं?, अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर आरोप

Arvind Kejriwal | नवी दिल्ली : गुजरात (Gujrat) येथे मोरबी पूल (Morbi Bridge) दुर्घटनेत १४० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला. या थरारक घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच आप (AAP) पक्षाचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजप (BJP) पक्षावर धक्कादायक आरोप केला आहे. ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या या अपघातात आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर आरोप केले आहेत. यावेळी मोरबी पूल दुर्घटना हा एक भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. कुठलाही अनुभव नसतांना या कंपनीला विनाटेंडर मेंटेनन्सचा ठेका दिलाच कसा?, असा प्रश्न केजरीवाल यांनी केल आहे.

पूल बनवणाऱ्या कंपनीकडून भाजपला फंडिंग होत होतं, हे खरं आहे का?, असा घणाघात अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच एक घडी बनवणाऱ्या कंपनीला पूल बनवण्याचा ठेका का दिला? कुठलाही अनुभव नसतांना देखभालीचं काम देण्यात आलं. हा पूल बांधण्यासाठी वर्षभराचा कालावधी आवश्यक असतांना केवळ पाच महिन्यांमध्ये पूल का बांधला? पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कंपनीचं आणि मालकाचं नाव का नाही?, असे सवाल देखील त्यांनी उपस्थित केले आहेत.

हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता. केबल ब्रिज बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात येत आहे. नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुलावर उभे असलेले शेकडो लोक मच्छू नदीत पडले. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी दुर्घटनेत आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला आहे.
राजकोटचे भाजपा खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांच्याही परिवारातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती खुद्द कुंदारिया यांनी दिली आहे. कुंडारिया यांच्या बहिणीच्या दिराच्या चार मुली आणि तीन जावई यांच्यासह पाच मुलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच कुंडारिया रविवारपासून मोरबीयेथेच तळ ठोकून बसले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

 

Arvind Kejriwal | नवी दिल्ली : गुजरात (Gujrat) येथे मोरबी पूल (Morbi Bridge) दुर्घटनेत १४० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला. …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now