आरेचे नाणार होईल, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

टीम महाराष्ट्र देशा : मेट्रो कारशेडसाठी आरे येथील २ हजार ७०० झाडे तोडण्यावर मुंबई मेट्रो रेल प्राधिकरण व भाजप सरकार ठाम आहे. मात्र या बेसुमार वृक्ष तोडीला नागरिकांनी नकार दर्शविला आहे. तर शिवसेनेनेही विरोध केला आहे. आरेतील कारशेडसाठी भाजपने हट्ट केल्यास जे नाणारच झाल तेच आरेच होईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

जैतापूर येथील नाणार प्रकल्पाला विरोध असतानाही भाजपने तेथे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, शिवसेनेने त्याला विरोध करत नाणार प्रकल्प रद्द केला. तसाच आरेतील कारशेड प्रकल्पही रद्द होईल, असे उद्धव ठाकरे यांनी आरेप्रकरणी भाजप सरकारला टोला लगावला आहे.

तसेच आदित्य ठाकरे यांनी देखील आरे येथील मेट्रोचे कारशेड दुसरीकडे हलवा अहि मागणी महा मेट्रोला केली आहे. नागरिकांचा आणि मित्रपक्षाचा विरोध असतानाही झाडे तोडण्यावर मुंबई मेट्रो रेल प्राधिकरण व भाजप सरकार ठाम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरेचे नाणार होणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.