भाजप विरुद्ध कॉंग्रेस आघाडी होतीये सज्ज

टीम महाराष्ट्र देशा : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकी नंतर काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात जोमाने कामाला लागला आहे. तसेच शिवसेना – भाजपला धुळीत मिळवण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीने आघाडीचा डाव रचला आहे. गेले काही दिवस या आघाडीच्या जागांचे वाटप कसे असावे आणि कोणाला कुठे जागा असाव्यात यावर घासाघीस चालू होती पण आता दोन्ही पक्षांनी समजुतीची भुमीका घेतल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्ष जानेवारी पर्यंत घटक पक्षांना बरोबर घेऊन आघाडी जाहीर करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त छोटया पक्षांना आघाडीत सामील करून घेण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे.

माकप , स्वाभिमानी शेतकरी संघटना , सपा , कपिल पाटील यांचा लोकभारती पक्ष , बहुजन विकास आघाडी असे अनेक छोटे पक्ष आघाडी साठी चर्चा करताना दिसत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 40 जागांवर आघाडीची चर्चा झाली होती. त्यातल्या पुण्याच्या जागेचा तिढा सोडवण्यात काँग्रेसला यश आलं आहे. राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगलेची जागा सोडली जाणार आहे, तर पालघरची जागा बहुजन विकास आघाडीसाठी सोडायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अकोल्याची जागा भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी ठेवण्याची आघाडीची तयारी आहे. अमरावतीची जागा राजेंद्र गवई यांच्यासाठी सोडली जाऊ शकते.पण त्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. त्याला गवई तयार नाहीत.

Loading...

राजू शेट्टी त्यांच्या पक्षाला सहा जागा मागत असले तरी एकाच जागेवर त्यांना समाधान मानावे लागणार आहे. आघाडीत सर्व काही आलबेल असलं तरी, सहा जागांचा पेच मात्र कायम आहे. त्यामध्ये अहमदनगर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नंदूरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या जागांचा समावेश आहे.

1 Comment

Click here to post a comment