कर्नाटक विधानसभेत भाजप ‘असं’ सिद्ध करणार बहुमत

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार आहेत. त्यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याचं मोठ आव्हान असणार आहे.

दरम्यान कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिकंण्यासाठी भाजपकडे तीन पर्याय उपलब्ध असणार आहेत. बहुमताची मॅजिक फिगर 112 असून, भाजपला 8 आमदारांची गरज आहे. कर्नाटमध्ये बहुमत सिद्ध करायचं असेल तर भाजपला काँग्रेस, जेडीएस आमदारांची फोडाफोडी करावी लागणार आहे. पक्षांतर बंदी कायद्यामुळे हा पर्याय सोपा नक्कीच नसणार आहे.

दुसरा पर्याय म्हणजे काँग्रेस-जेडीएसच्या 8 आमदारांना गैरहजर राहायला सांगून बहुमतासाठीचं संख्याबळ कमी करणे आणि तिसरा आणि शेवटचा पर्याय म्हणजे जेडीएसचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. जर यामध्ये भाजप यशस्वी झाले तरच कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापन करता येईल.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...