शहा तसे बोललेच नाहीत, राम मंदिराच्या मुद्यावर भाजपचा कोलांटउड्या

amit shaha

टीम महाराष्ट्र देशा: केंद्रामध्ये सत्तेवर आपल्यापासून राम मंदिराच्या मुद्यावर भाजप नेत्यांकडून वेगवेगळी विधाने केली जात आहेत, आता आगामी लोकसभा निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हैदराबाद येथे केलं होत. मात्र, यावर वाद निर्माण होताच खुद्द अध्यक्षांच्या विधानावर स्पष्टीकरण देण्याची वेळ भाजपवर आली आहे. शहा यांनी राम मंदिरा विषयी कुठलेही विधान केले नसल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

हैदराबाद येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना, शहा यांनी राम मंदिराच्या बांधकामबद्दल विधान केल्याची माहिती भाजप नेत्यांकडूनच देण्यात आली होती, यावर एमआयएम नेते असाउद्दिन ओवेसी यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर वादाबाबत निकाल द्यायला हवा, असे मत व्यक्त केले होते.

दरम्यान, शहा यांच्या विधानाच्या बातम्या प्रसिद्ध होताच वादाला सुरुवात झाली. त्यामुळे भाजपने आता बचावात्मक पवित्र घेण्यास सुरुवात केली आहे.