विकास वेडा झाल्यानंतर आता ‘विजय’ विकत घेण्याच्या हालचाली; सामनातून भाजपवर टीकास्त्र

मुंबई: गुजरातमधील विकास वेडा झाल्यानंतर आता विजय विकत घेण्याच्या हालचाली सत्ताधारी पक्ष करीत आहे. गुजरात हे राज्य आता महात्मा गांधी व सरदार पटेलांचे राहिले नसून ते पैशांच्या जोरावर राज्य करणाऱ्यांचे झाले आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै सामनाच्या संपादकीयामधून करण्यात आली आहे . सामनाच्या आजच्या संपादकीयमध्ये भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवण्यात आला आहे. यात आगामी गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हालचालींवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

एखाद्या राज्यास तेथील राजकारणी कसे बदनाम करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरात. सध्या तिथे जो ‘तीन पत्ती’ जुगाराचा डाव खेळला जात आहे तो पाहता हे राज्य आता महात्मा गांधी व सरदार पटेलांचे राहिले नसून ते पैशांच्या जोरावर राज्य करणाऱ्यांचे झाले आहे, असा टोला सामनामधून लगावला आहे. गुजरातमधील निवडणूक भाजपसाठी सोपी नाहीपंतप्रधान मोदी हे बरेच दिवस परदेश दौऱ्यावर गेलेले नाहीत. अलीकडे त्यांनी जास्तीत जास्त वेळ गुजरातला दिला आहे. म्हणजेच गुजरातमध्ये भाजपला आव्हान आहे व त्या पक्षासाठी विधानसभेचे मैदान सोपे नाही. मोदी म्हणजे गुजरातचे सर्वेसर्वा व हृदयसम्राट असतील आणि त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत गुजरातचा प्रचंड विकास केला असेल तर मग प्रचाराचा धुरळा न उडवता त्यांना सहज मोठा विजय मिळवता आला असता. मोदी यांनी गुजरात विकासाचे जे ‘मॉडेल’ भाषणबाजी व सोशल मीडियातून समोर आणले ते खरे आहे असे एकवेळ मान्य केले तर मग ऐन निवडणुकीत गुजरातेत बसून त्यांना घोषणांचा पाऊस व धमक्यांचा गडगडाट करावा लागत आहे?, असा सवाल सामनातून विचारण्यात आल आहे.

Rohan Deshmukh

कुठे आहेत ते ‘ईडी’ स्पेशालिस्ट!

मुंबईत सहा नगरसेवकांचे शिवसेनेत आगमन झाले तो भ्रष्टाचार आहे असे ज्यांना वाटते त्यांनी गुजरातेत चाललेला ‘नोटाबंदी’चा ‘गरबा’ ही ईडीच्या टिपऱ्यांनी घुमवायला नको काय? फसवणूक व खोटेपणा करून सदासर्वकाळ लोकांना मूर्ख बनवता येणार नाही, असेही या संपादकीयामध्ये म्हटले आहे. फसवणूक व खोटेपणा करून सदासर्वकाळ लोकांना मूर्ख बनवता येणार नाही. महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्यासाठी व शिवसेनेचा राजकीय पराभव करण्यासाठी पैशांचा वापर झाला, लोकांना विकत घेतले गेले हे एकवेळ समजू शकतो, पण गुजरात तर तुमचेच आहे ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या राज्यात ज्या काही सुधारणा केल्या त्यामुळे देशाला नवी दिशा आणि नवा प्रकाश दिल्याचा गवगवा नेहमीच होत असतो. मग आता पैशांचे प्रयोग करून लोक विकत घेण्याचे व विरोधकांची तोंडं बंद करण्याचे प्रकार का सुरू आहेत? असा सवालही या अग्रलेखात करण्यात आला आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...