गुजरातमध्ये १४० इंजिनिअर ५ हजार ईव्हीएम हॅक करण्याच्या कामाला; हार्दिक पटेलचा गंभीर आरोप

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी (ता १८.) ला जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी ब्लूटूथद्वारे ईव्हीएम मशीनसोबत छेडछाडीच्या आरोपांनंतर ६ ठिकाणी फेरमतदान घेतले जात आह. दरम्यान पाटीदार समाजाच नेता हार्दिक पटेल यांनी ट्विट करत पुन्हा एकदा इव्हिएमच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाना साधलाय. गुजरातमध्ये एका कंपनीचे १४० इंजिनिअर ५ हजार ईव्हीएम हॅक करण्याच्या कामाला लागले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

गुजरात निवडणुकांसाठी मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. याधीही भाजपा मोठा इव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचे हार्दिक पटेलने म्हटले होते. तसेच भाजपाने इव्हीएम घोटाळा केला नाही तर त्यांना 82 जागा मिळतील असा दावाही हार्दिक पटेल यांनी केला.

You might also like
Comments
Loading...