fbpx

कर्नाटकच्या सत्तापालटासाठी भाजपने केली कॉंग्रेस- जेडीएसची मुंबईतून नाकेबंदी

मुंबई: कर्नाटकच्या सत्ताकारणामध्ये पुन्हा एकदा नाट्यमय हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कॉंग्रेस – जेडीएस आघाडीला सुरुंग लावण्यासाठी मुंबईतील एका बड्या भाजप नेत्याने नाकेबंदी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कर्नाटकमध्ये भाजप सत्ताधारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मागील वर्षी कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठीच्या निवडणुकीत भाजपल सर्वाधिक १०४ जागांवर विजय मिळाला होता, मात्र २०१४ मध्ये उसळलेला भाजपचा सत्तेचा अश्वमेध रोखण्यासाठी कॉंग्रेस – जनता दल सेक्युलरने आघाडी करत सत्तास्थापन केली होती. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकून घाईघाईने येडीयुरप्पांचा शपथविधी उरकलेल्या भाजपला नामुष्की पत्करात सत्तेतून पायउतार व्हावं लागलं.

आता कॉंग्रेसचे १० आमदार फोडण्यात भाजपला यश आल्याचं दिसत आहे. या सर्व कॉंग्रेस आमदारांची बडधास्त ठेवण्याचे काम मुंबईतील एका भाजप नेत्यावर सोपवण्यात आले आहे. त्यांची सोय पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ गाठण्यासाठी आणखीन काही कॉंग्रेस आमदारांशी घोडेबाजार सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.