‘लवकरच ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ घोटाळेबाज सरकारला भाजप घरी पाठवणार’

‘लवकरच ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ घोटाळेबाज सरकारला भाजप घरी पाठवणार’

kirit SOMAYAA

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या सतत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे -पवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार असल्याची टीका केली आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका करत इशारा दिला आहे.

ठाकरे-पवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार आहे . हे सरकार महाराष्ट्राला लुटण्याचे काम करीत आहे . सांगोला साखर कारखान्यासह घोटाळ्यांची प्रकरणे आपल्याकडे आली असून , या सर्व घोटाळ्यांचा पाठपुरावा आपण करणार आहोत. असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी राज्यातील अनेक मंत्र्यांच्या चौकशा सध्या सुरू असल्याचे म्हटले आहे. अनेक मंत्री सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. सध्याच्या ठाकरे सरकारचे माजी गृहमंत्री फरार आहेत, कमिशनर परदेशात गेले आहेत, पोलिस अधिकारी अटकेत आहेत. हे सरकार आहे की माफिया आहे, असा प्रश्न करून अनेक नेत्यांनी कारखाने लुटण्याचे काम केले असून, पवारांच्या घरात सर्वांचीच बेनामी मालमत्ता असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या