भाजप तालुकाध्यक्षच जिवे मारण्याची धमकी देत असल्याच्या कार्यकर्त्याच्या आरोपाने खळबळ

औरंगाबाद : भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे यांच्या विधानसभा उमेदवारीला विरोध केला म्हणून शिसोदे त्यांच्या समर्थकामार्फत जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते ज्ञानेश्वर वाघ यांनी केला आहे. पक्षाच्या चिंतन बैठकीत व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड याच्या उपस्थितीत त्यांनी हा आरोप केल्याने पक्ष कार्यकर्त्यामध्ये एकच खळबख उडाली.

शिसोदे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावत वाघ अनेक दिवसांपासून पक्ष संघटनेपासून अलिप्त असल्याच म्हटले आहे. शहरातील झेंडुजी महाराज मठ येथे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा प्रभारी डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती व नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या निराशाजनक कामगिरीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

ग्रामीण भागातून आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांनी या बैठकीत भाजपचे स्थानिक नेतृत्व मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप केला. तर, पाचोड येथील भाजप कार्यकर्ते ज्ञानेश्वर वाघ यांनी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे यांच्या विधानसभा उमेदवारीला विरोध केला म्हणून ते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा थेट आरोप शिसोदे यांच्यावर केला. कराड यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यकर्त्यांने, तालुकाध्यक्षावर जिवे मारण्याचा गंभीर आरोप केल्यावर येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली

You might also like
Comments
Loading...