fbpx

राज यांच्या सभा सार्थकी , हरिसाल गावातले तांत्रिक प्रश्न सोडवणार : विनोद तावडे

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकी मध्ये सहभागी नसले तरी मनसेच्या व्यासपीठावरून सत्ताधारी भाजपचा खोटेपणा जनते समोर आणत आहेत. त्यामुळे भाजप नेते आता चांगलेच तोंडघशी पडले आहेत. भारतातलं पहिलं ‘डिजिटल गाव’ अशी ओळख मिळालेल्या हरिसाल या गावाचं खरं सत्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोलापूरच्या सभेतून जगासमोर आणल. त्यांनतर आता राज ठाकरेंच्या वक्तव्याला गांभीर्याने घेत हरिसाल गावातले जे काही तांत्रिक प्रश्न असतील ते सोडवले जातील, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.

याआधी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात हरिसाल गावाचे सत्य जगासमोर आणले होते. तर सोमवारी झालेल्या सभेमध्ये त्यांनी हरिसाल गावाच्या जाहिराती मधील तरुणाला व्यासपीठावर आणत हरिसालच्या खोट्या विकासाचं पितळ उघड पाडल आहे.

त्यामुळे राज ठाकरे यांची सभा खऱ्या अर्थाने सार्थकी लागत आहेत कारण हरिसाल गावातले जे काही तांत्रिक प्रश्न असतील ते सोडवले जातील असे आश्वासन तावडे यांनी दिले आहे तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांचा दावा खोटा असल्याचं सांगत आहेत.