‘हा’ भाजपनेता धनंजय मुंडेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात राजकीय अस्थिरता असल्याने अनेक सत्ताधरी पक्षाचे नेते विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीला जात आहेत. आज शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तर आता भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

विधानसभा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज १३ दिवस झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे राज्यात कोणाचे सरकार येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता संघर्षाचे सत्र सुरु आहे. त्यामुळे राज्यात कोणाचे सरकार येणार याकडेचं साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मात्र अशा अस्थिर परिस्थितीतचं सत्ताधारी नेते आणि विरोधकांमध्ये गाठीभेटी होताना दिसत आहेत. त्यात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड हे भेट घेण्यासाठी पोहोचल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हे दोन्ही नेते आपआपल्या पक्षाचे प्रमुख असल्याने यांच्यात काय चर्चा होणार हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या