टीकेचा करंट बसल्यावर सावध झाले दानवे; थकीत लाईटबिल भरले

ravsaheb danve patil

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी वीजबिल थकवल्याचा प्रकार समोर आला होता. दानवेंनी वीजबिल थकवल्या संबंधीच्या बातम्या माध्यमांमधून झळकू लागल्यानंतर तसेच सगळीकडून टीका होऊ लागल्यावर अखेर त्यांनी वीजबिल भरलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये घर आहे. गेल्या 83 महिन्यांपासून महावितरणचं तब्बल 2 लाख 59 हजार 176 रुपयांचं वीजबिल दानवेंनी थकवलं. महावितरणनं जारी केलेल्या जुलैच्या वीजबिलावर तसा स्पष्ट उल्लेखही करण्यात आला होता. फक्त जुलै महिन्यातच दानवेंकडे 29 हजार 595 हजारांची थकबाकी होती.आश्चर्याची बाब म्हणजे महावितरणनेही दानवेंवर कोणतीही कारवाई केलेली नव्हती. सगळीकडून टीका होऊ लागल्यावर अखेर त्यांनी वीजबिल भरलं आहे.