मुख्यमंत्री गृहखात सांभाळत असतानाचा हा पहिलाच गोळीबार – दानवे

अहमदनगर: ‘मुख्यमंत्र्यांनी गृहखात सांभाळण्यास सुरुवात केल्यानंतर हा पहिलाच गोळीबार असून असा प्रकार पुढील काळात होणार नाही याची काळजी घेतली जाईल. आमच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल. मात्र गोळीबार चुकीचा असून ही अयोग्य घटना असल्याच’ भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
अहमदनगरमधील शेवगाव येथे ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले आहेत. आज जखमी झालेल्या शेतकरी आंदोलकांची रावसाहेब दानवे यांनी भेट घेतली यावेळी ते बोलत होते.

bagdure

पोलिस हे शेतकऱ्यांच्या पायावर गोळी चालवू शकले असते मात्र गोळी छातीत लागली हे चुकीचे असल्याचही दानवे म्हणाले आहेत. तसेच जखमी झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत केली जाणार असल्याच त्यांनी सांगितल.

You might also like
Comments
Loading...