कोंडून ठेवलेले उंदीर जसे बाहेर पडतात तसे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले लोक बाहेर पडतील – दानवे

औरंगाबाद: महाराष्ट्रात सध्या कोणत्याही निवडणुका नसल्या तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. ‘विरोधी पक्षातील नेत्यांचे एक पाय बाहेर तर एक तुरुंगात असल्याच’ म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. औरंगाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच कोंडून ठेवलेले उंदीर जसे दरवाजा उघडल्यावर बाहेर पडतात तसे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले लोक बाहेर पडत असल्याची टोला देखील त्यांनी लगावला.

हिवाळी अधिवेशानापुर्वी राज्यभरात कॉंग्रेसने जन आक्रोश तर राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन काढत शेतकरी कर्जमाफी आणि राज्यातील समस्यांवर सरकारची कोंडी केल्याच पहायला मिळाल. तर अधिवेश सुरु असताना नागपूरमध्ये लाखोंचा सर्वपक्षीय संयुक्तिक मोर्चा देखील काढण्यात आला होता. आपल्या नेत्यांची प्रकरणे झाकण्यासाठी ‘सरकारवर दबाव टाकण्यासाठी आंदोलन आणि मोर्चे काढले जात असल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी यावेळी केली

You might also like
Comments
Loading...