यापुढे कधीही शिवसेनेशी युती करणार नाही – चंद्रकांत पाटील

मुंबई : महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकेल. मात्र, ते पाडण्यात आम्हाला रस नाही. यापुढे भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी कधीही युती करणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील सरकारमधील तीन पक्ष दररोज वेगवेगळी वक्तव्ये करत असतात. त्यातील प्रत्येकाची दररोज वेगवेगळी भूमिका असते. पण, आम्ही त्या कोणत्याही वादात न पडता जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहोत, असे ते म्हणाले. नवी मुंबई येथे झालेल्या अधिवेशनात महत्त्वाची मंडळी हजर होती. मुदतपूर्व निवडणुकीची वेळ महाराष्ट्रावर आली, तर आम्ही केव्हाही त्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading...

तीन पक्षांच्या कारभारात कायदा व सुव्यवस्थेकडे प्रचंड दुर्लक्ष होते आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी २५ रोजी राज्यातील तब्बल ४०० महत्त्वाच्या ठिकाणी धरणे आंदोलन केले जाणार आहे. या प्रत्येक ठिकाणी किमान एक हजार कार्यकर्ते सहभागी होतील. सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात हे आंदोलन असल्याचेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय