…तर बारामतीमध्ये वेगळे चित्र पहायला मिळाले असते – चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा: माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने ‘माढा शरद पवारांना पाडा’चा नारा दिला, त्यामुळे पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. बारामतीमध्ये देखील सुप्रिया ताईंना घरी पाठवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेच्या दोन दिवस आधी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असता तर बारामतीमध्ये वेगळे चित्र पहायला मिळाले असते, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

माजी मंत्री आणि जेष्ठ कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला, मुंबईतील गरवारे सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणूकीचे भाकीत देखील वर्तवले आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत आचारसंहिता जाहीर होणार असून १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान मतदान

पार पडेल, असे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, निवडणुकीत युतीला २५० जागांवर विजय मिळेल, यामध्ये इंदापूरची जागा वाढली असल्याचं पाटील म्हणाले.