भाजपने सुरु केली निवडणुकीची तयारी, शाह घेणार ८ जूनपासून ऑनलाइन बैठका

amit shah

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याने देश संकटात सापडला आहे. महाराष्ट्र,प.बंगाल, दिल्लीसह बिहारमध्ये देखील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या राज्यात आगामी काळात निवडणुका असल्याने आता भाजपानं आता बिहार आणि पश्चिम बंगालकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे.

भाजपानं ऑनलाइन बैठकाचा कार्यक्रम जाहीर केला असून बंगालमध्ये ८ जूनपासून ऑनलाइन बैठका घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह संबोधित करणार आहेत.

नेमकं काय होणार या ऑनलाइन बैठकांमध्ये

“ऑनलाइन बैठकांच्या माध्यमातून पक्ष पश्चिम बंगालमधील लोकांपर्यंत पोहोचणार आहे. या बैठकांमध्ये पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्यासह सामान्य लोकांनाही सहभागी होता येणार आहे या मीटिंगबद्दलची माहिती आणि पक्षाचा संदेश सोशल माध्यमातून दिला जाणार आहे.

प्रत्येक बैठकीत पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत १००० जण सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर अतिरिक्त १००० लोकही यात सहभागी होऊ शकणार आहेत. यात राज्यातील नेत्यांनाही बोलण्याची संधी दिली जाणार आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला ९ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करणार आहेत. या व्हिडिओ कॉन्फ्रसिंगमुळे बिहारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण होईल आणि बिहारमधील निवडणुकीच्या मोहिमेच्या कार्यक्रमाची सुरवातही होईल. असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून अमित शाह एक लाख लोकांपर्यंत पोहोचतील. ते या सभेमधून पक्षाची तयारी आणि इतर कामांची माहिती देतील. त्यानंतर भाजपाचे राष्ट्र्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेसुद्धा व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून ते निवडणूक प्रचाराची तयारी सुरू करतील. अस देखील डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले आहे.

अमेरिकन आयोगाने केली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निर्बंध लादण्याची मागणी

वडील, आजोबा स्टेजवर आणि पवारांची तिसरी पिढी कार्यकर्त्यांमध्ये

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेला छत्रपती उदयनराजेंची दांडी !