मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर शरद पवारांनी स्वतंत्र मोट बांधत राष्ट्रवादी काँग्रेसची बीजं पेरली. तिच राष्ट्रवादी काँग्रेस आज राज्यातील सत्तेत महत्त्वाच्या भूमिकेत वावरताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे. असे विधान केले आहे.
‘केंद्रात भाजपचं सरकार आहे. या सरकारने देशातील एकता आणि आखंडतेला धक्का देण्याचं काम सुरू केलं आहे. लोकशाही संस्था मोडीत काढण्याचं काम सुरू केलं आहे. पत्रकारांपासून अनेक घटकांची मुस्कटदाबी सुरू आहे. लोकशाहीला झुंडशाहीचं स्वरुप देण्याचं काम सुरू आहे. संविधान वाचवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. अशावेळी लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपच्या यशामागे मोदींचा चेहरा, तेच भाजपचे नेते’, राऊतांनी कौतूक केल्याने भुवया उंचावल्या
- चंद्रकांतदादांनी ‘असं’ करायला नको होतं, जयंत पाटलांचा टोला
- मराठा वसतिगृहासाठी जालन्यातील १५१ ग्रामपंचायतीमध्ये निषेध आंदोलन
- न्यूझीलंडला हरवण्यासाठी टीम इंडियासज्ज ; मैदानात उतरताच विराट म्हणाला…
- कलम-३७० चा परिणाम; भारतीय कंपन्यांना क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क देण्यास पाकिस्तान सरकारचा नकार