शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणूनच भाजपने सुशांतसिंह, रिया चक्रवर्ती सुरू केले- अशोक चव्हाण

ashok chavan

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात आदर्श तत्वे रुजविली. त्यांचे वारसदार ना.बाळासाहेब थोरात हे राज्यात यशस्विपणे नेतृत्व करीत आहेत.

सहकाराने ग्रामीण भागात नंदनवन फुलविले आहे. मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यातील शेतकरी व सहकार संकटात सापडला आहे. शेतकरी व गोरगरिबांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष व्हावे, म्हणून सुशांतसिंह प्रकरण, रिया चक्रवती, टी.आर.पी प्रकरण सुरु आहे, अशी टीका सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५४व्या गळित हंगामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

ना.चव्हाण पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्शवत तत्वे राज्याला दिली. २०१४ पासून मोदी सरकारने आयात निर्णयासह सर्व धोरणे भांडवलदारांसाठीच घेतले आहे. सहकार मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे अनेक साखर कारखाने बंद पडले. उत्पादन खर्च धरुन साखरेची आधारभूत किंमत ठरवली जात नाही.

त्यामुळे राज्यातील अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. राज्यातील अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना महाविकास आघाडी सरकारने कर्ज उपलब्ध करुन देण्याची हमी घेतली आहे. राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे, असे ना.चव्हाण म्हणाले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, राज्यसभा खासदार राजीव सातव, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव वामसी चांद रेड्डी, आशिष दुआ, बी.एम.संदीप, युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-