अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज

choundi

नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दोन गटांनी गोंधळ घातला. आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

अहिल्यादेवी होळकर यांची जयंती त्यांच्या जन्मगावी चौंडी येथे साजरी होत असतांना गोंधळ झाला. पालक मंत्री राम शिंदे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम योजिला होता. या कार्यक्रमाला लोसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन उपस्थित होत्या.

राम शिंदे यांचे भाषण सुरु असतांना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली आणि गोंधळ निर्माण झाला. हा कार्यक्रम भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप करुन तिथे दुसऱ्या कार्यक्रमासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र पोलिसांनी ती परवानगी नाकारली आणि धनगर कार्यकर्त्यांना चौंडीत येण्यास बंदी घातली होती. त्याचेच पडसाद आजच्या कार्यक्रमात उमटले.