टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पुलाचा भाग गुरुवारी संध्याकाळी कोसळला. या दुर्घटनेत तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण गंभीर जखमी झाले माहिती आहे. घटनेतील जखमींवर जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मात्र अशात भाजप नेत्या संजू वर्मा यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत असंवेदनशिलतेचा कळस गाठला आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात या घटनेला पादचारीच जबाबदार असल्याच संतापजनक वक्तव्य वर्मा यांनी केलं आहे.
संजू वर्मा यांनी सुरुवातील हे नैसर्गिक संकट असल्याचं सांगितलं. त्यानंतर या दुर्घटनेशी सरकारचा काहीही संबंध नसल्याचं सांगत हात वर करण्याचा प्रयत्न केला. पण या दुर्घटनेसाठी पादचारीच जबाबदार असल्याचं सांगितलं.
A large part of the blame was on the pedestrians: @Sanju_Verma_, Leader, BJP while speaking to @navikakumar | #MumbaiBridgeCollapse pic.twitter.com/FUrSsYa7R1
— TIMES NOW (@TimesNow) March 14, 2019
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सीएसएमटी पूल दुर्घटनेतील जखमींची सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच घटनास्थळी जाऊन पुलाची पाहणीही केली. घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.