fbpx

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुल ‘लावारीस’, भाजप प्रवक्त्याचे निर्लज्ज विधान

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्वच पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहते, यामध्ये सध्या राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त विधाने देखील केली जात आहेत. भाजप प्रवक्ते असणारे अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची अवहेलना करणारे विधान केले असून, त्यामुळे वाघ यांच्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

‘आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा… हागणारा नाही तर बघणारा लाजातो’ असे ट्विट वाघ यांनी केले आहे. ट्विटरवर ‘मराठा क्रांती वारियर’ नावाने चालणाऱ्या अकाऊंटच्या पोस्टला उत्तर देताना अवधूत वाघ यांनी हे विधान केले आहे.

दरम्यान वाघ यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटवर अनेकांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रावादी कॉंग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘ ज्यांचे आई वडील मरण पावतात त्यांना अनाथ म्हंटले जाते..लावारीस म्हणजे बेवारस..In english it is bastard, आत्महत्या ग्रस्त शेतकरी ह्यांची मुलं परिस्थितीमुळे अनाथ झाली, त्यांना लावारीस म्हणून शेतकऱ्यांना अपमानित केले जात आहे, अशी टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वीच बेताल अवधूत वाघ यांनी ‘ ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णूचा अकरावा अवतार’ असल्याचे वक्तव्य केले होते. वाघ यांच्याकडून कायम केले जाणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपने त्यांना कोणत्याही माध्यमांशी बोलण्यास बंदी देखील घातली होती.