आरक्षणाच्या मुद्यावर शरद पवारांनी ३६० डिग्री टर्न का घेतला ? – भंडारी

madhav bhandari bjp

पुणे: अडीच वर्षापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आर्थिक निकषानुसार आरक्षणावर भाष्य केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी थयथयाट केला होता. मात्र आता असं काय घडल कि त्यांनी ३६० डिग्री युटर्न घेतला? असा प्रश्न भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी उपस्थित केला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीवेळी शरद पवार यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याविषयी भूमिका मांडली होती. पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. दरम्यान, आरक्षणा संदर्भात पवार यांनी आजवर केलेली सर्व विधाने तपासण्याची गरज असल्याची टीका भंडारी यांनी केली आहे. तसेच १५ वर्षाच्या सत्ताकाळात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मराठा धनगर तसेच इतर जातींना आरक्षण मिळवून देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. त्यामुळे तत्कालीन सरकारच अपयश झाकण्यासाठीच सध्या खटाटोप होत असल्याचा आरोपही माधव भंडारी यांनी यावेळी केला.

आम्ही आजही शिवसेनेला मित्रपक्ष मानतो
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना आजवर एकत्र आले आहेत. मात्र काही घटकांकडून हिंदू मतांमध्ये फुट पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेन जरी वेगळे लढण्याचा निर्णय घेतला असला तरी आजही आम्ही त्यांना मित्र मानतो.