‘युती झाली तर दोन आणि न झाल्यास भाजपाने आरपीआयला चार जागा सोडाव्यात’

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा – शिवसेना यांची युती अंतिम टप्प्यात होईल. युती झाली तर दोन आणि न झाल्यास भाजपाने आरपीआयला चार जागा सोडाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते.

युतीच्या राजकारणात आरपीआयला कमी जागा सोडल्या जातात. त्यामुळे इच्छा असूनहीअन्य समाज घटकांना उमेदवारी देता येत नाही. मात्र यापुढील काळात भटक्या विमुक्त, इतर मागास वर्गीय समाजाच्या प्रतिनिधींना उमेदवारी देण्याचा प्रयत्न राहील, असेआठवले म्हणाले.