VIDEO- छिंदम यांनीच नाही तर भाजपने माफी मागितली पाहिजे- अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा – अहमदनगर महापिकेतील भाजपचे निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केल्यानंतर आता मोठ्याप्रमाणावर राजकीय प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचे वक्तव्य भाजपच्या वैचारीक दिवाळखोरीचे प्रदर्शन करणारे आहे . याप्रकरणी छिंदम यांनीच नाही तर भाजपने माफी मागितली पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदमवर सरकारने शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन त्वरित कडक कारवाई करावी व त्याला महाराष्ट्रातून हद्दपार करावे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. अशा समाज कंटकास जेवढे शासन होईल तेवढे कमी आहे. अशा शब्दांत खासदार युवराज संभाजीराजे यांनी अहमदनगरच्या छिंदम प्रकरणावर फेसबुक पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

abvp,mnsश्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून अपमान केल्यानंतर सर्वत्र निदर्शने करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवप्रेमी संघटना तसेच शिवसेनेकडून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली .पुण्यात मनसेकडून छिंदमच्या पुतळाल्या भर चौकात फाशी देण्यात आली. तसेच वंदे मातरम संघटनेकडून छिंदमच्या वक्ताव्याचा निषेध करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी श्रीपाद छिंदम याचा पुतळा जाळुन निषेध व्यक्त केला.

काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदम हे अहमदनगर महापालिकेचे उपमहापौर आहेत. छिंदम यांनी त्यांच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.