fbpx

युपीत भाजपला झटका; सपाचा मोठा विजय

up akhilesh

लखनौ: विजयाची घोडदौड सुरु ठेवणाऱ्या भाजपला उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फूलपूर लोकसभा पोटनिवडणुकीत झटका बसला आहे. फूलपूर लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये सपा-बसपा युतीने भाजपचा पराभव केला. तर गोरखपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव जवळपास निश्चित आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी पराभव मान्य केला आहे.

फूलपूरमध्ये सपाचे उमेदवार नागेंद्र पटेल यांनी भाजपच्या कौशलेंद्र पटेल यांना ५९,६१३ मतांनी पराभव केला. फूलपूर हा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा मतदारसंघ आहे. तर गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रवीण निषाद तर फूलपूरमध्ये नागेंद्र पटेल यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

उत्तर प्रदेशच्या लोकसभा पोटनिवडणुकीत झालेला पराभव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मान्य केला आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागांवर भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. आम्ही उत्तर प्रदेशच्या जनतेने दिलेला कौल मान्य करतो. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. नागरिकांच्या इच्छेनुसार विजयी उमेदवार राज्याच्या विकासामध्ये योगदान देतील अशी अपेक्षा आहे असे योगी म्हणाले. हा निकाल आमच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित आहे. कुठे कमी पडलो त्याचा आढावा घेऊ.

1 Comment

Click here to post a comment