fbpx

नाशिकमध्ये भाजपला धक्का; हा उमेदवार लढवणार अपक्ष निवडणूक

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सेना-भाजप युतीला नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नाशिक मतदारसंघ हा शिवसेनेच्या कोट्यातला आहे. शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या बंडखोरीने हेमंत गोडसे यांना फटका बसण्याची शक्यता आहे. जर भाजपकडून विधानसभेचं आश्वासन मिळाल्यास ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील अशीही चर्चा आहे. कोकाटे यांनी अर्ज भरतेवेळी ‘वेळ मिळाल्यास एबी फॉर्म ही देण्यात येईल’ असं वक्तव्य करत निवडणूक लढवणारच असं दाखवून दिले आहे.

जर माणिकराव कोकाटे यांनी अर्ज मागे नाही घेतला तर नाशिकमध्ये तिरंगी लढत होईल. शिवसेनेकडून हेमंत गोडसे, राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ आणि अपक्ष माणिकराव कोकाटे यांच्यात सामना होईल.