भाजपाला झटका! यशवंत सिन्हा यांचा भाजपाला राम राम

पाटणा (बिहार): भाजपला आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपाला राम राम केला आहे. यशवंत सिन्हा यांनी देशासाठी राष्ट्रमंच स्थापन करण्याची घोषणा केली तसेच मी आजपासून राजकारणातून संन्यास घेतो आहे. माझे भाजपासोबत असलेले सगळे नाते मी तोडून टाकतो आहे असेही सिन्हा म्हणाले, ते बिहारमधील पाटणा या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. विरोधकांना काहीही किंमत उरलेली नाही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही त्यामुळे देशात लोकशाही असे वाटत नाही असाही टोला यशवंत सिन्हा यांनी लगावला आहे. यापूर्वी त्यांनी अनेक सभांमध्ये भाजपविरोधी भूमिका घेतली होती. येत्या काळात कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नाही असेही त्यांनी जाहीर केले.

You might also like
Comments
Loading...