जनतेच्या मनात असलेली युती आता मैदानात उतरली, महायुतीची अधिकृत घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीला शिवसेना – भाजप – रिपाई – शिवसंग्राम – रयत क्रांती – रासप हे महायुती करून सामोरे जाणार आहेत. त्यामुळे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीची अधिकृत घोषणा केली. याआधी सयुंक्त पत्रक काढत महायुतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र आज संयुक्त पत्रकार परिषद घेत सर्व पक्षाचे प्रमुख नेते महायुतीची घोषणा केली. ही घोषणा केवळ औपचारिकता आहे. या पत्रकार परिषदेला भाजप शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेकांच्या मनात प्रश्न होता युती होईल का मात्र हिंदुत्व या धाग्यामुळेच युती झाली. विचारांमध्ये मत भिन्नता होती. मात्र मनभेद नसल्याने युती पक्की झाली. भाजप 150, शिवसेना 124, आणि मित्रपक्ष 14 असा फॉर्म्युला ठरवण्यात आला.युती झाल्याने अनेकांनी बंडखोरी केली आहे. मात्र बंडखोरांना 2 दिवसात अर्ज मागे घेयला लावू.कोणी बंडखोरी केली तर आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.

तसेच उद्धव ठाकरे यांनी लहान आणि मोठ्या भावाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की,लहान भाऊ मोठा भाऊ असं काही नसत भावाभावांमधील नात महत्वाच असत. नात कस आहे हे पाहिलं जात. आता आमची युती झाली आहे.त्यामुळे सगळे प्रश्न बसून समजूतदारपणाने सोडवले आहेत. पुढील काही प्रश्नही असेच सोडवणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपने या विधानसभा निवडणुकीत अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे. यावर फडणवीस म्हणाले की, ज्यांची तिकीट कापली आहेत. त्यांची जबाबदारी बदलली आहे. ते लवकरच सगळ्यान समोर येईल. तसेच आदित्य ठाकरे या विधानसभा निवडणुकीला भरगोस मताने निवडून येणार आहेत, असाही विश्वास फडणविसांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या