भाजप-शिवसेना एकत्रच निवडणूक लढवणार! स्वतंत्र लढले तर घरी जातील: अजित पवार

टिम महाराष्ट्र देशा : कितीही बातम्या आल्या तरी भाजप-शिवसेनेवाले एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यांना माहीत आहे स्वतंत्र लढले तर घरीच जातील. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे टिकात्मक तोफ डागत आहेत.

कुणा एकाचं कुंकू लावा. सतरा जणांचं कुंकू लावू नका, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले. तसेच काही जण दुटप्पी बोलतात आणि करतात. आमच्या पक्षाची विचारधारा पटत नसेल तुमची वाट मोकळी आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला. कांदळी येथे झालेल्या जुन्नर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

अजित पवारांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

●शेतमालाची अवस्था बेकार झाली आहे. शेतकऱ्यांची अवस्था पहा आणि मग बोला. मुंबईत राहून बोलू नका.
●बुलेट ट्रेन ची गरज नाही. पुणे-नाशिक ट्रेन केली तर जुन्नर आंबेगाव ला फायदा तरी होईल. तुमच्या खासदाराने 3/3 वेळा निवडून येऊन काहीही केलं नाही.
●उसाला दर देण्यासाठी पवार साहेबांनी सूत्र ठरवले होते. मात्र केंद्र व राज्य सरकार लक्ष घालत नाही.
●पाशा पटेल, सदा खोत पवार साहेबांवर काहीही बरळतात.
●मंत्रीमंडळात पश्चिम महाराष्ट्रतील प्रश्न मांडणारा एकही नेता नाही. बापट काय करतात त्यांचं त्यांनाच माहीत.
●कितीही बातम्या आल्या तरी भाजप-शिवसेनेवाले एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यांना माहीत आहे स्वतंत्र लढले तर घरीच जातील.
●शिरूर लोकसभा मतदार संघातील खासदार राष्ट्रवादीचा झाला पाहिजे.
●काही जण दुटप्पी बोलतात आणि करतात. आमच्या पक्षाची विचारधारा पटत नसेल तुमची वाट मोकळी आहेत.
●कुणा एकाचं कुंकू लावा, सतरा जणांचं नका कुंकू लावू

अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले यावेळी दिलीप वळसे पाटील,विश्वासनाना देवकाते, जालिंदरभाऊ कामठे, जिल्हा महिला राष्ट्रवादी अध्यक्षा वैशालीताई नागवडे, अतुल बेनके, आंबेगाव बाजार समिती सभापती देवदत्त निकम, पाडुरंग पवार, शरदराव लेंडे, आदींची उपस्थिती होती.